झांशी
झांशी : उत्तर प्रदेश राज्याच्या याच नावाच्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे प्रमुख ठाणे. लोकसंख्या झांशी शहर १,७३,२९२ आणि छावणी व रेल्वे वसाहतीसह १,९८,१३५ (१९७१). हे आग्र्याच्या दक्षिणेस सु. २१० किमी. असून लोहमार्ग प्रस्थानक व सडकांचे मोठे केंद्र आहे.